*राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये मदर तेरेसा स्कूलच्या दोन खेळाडूंची निवड, मदर तेरेसा स्कूल च्या दोन खेळाडूंना सुवर्ण पदकाचा मुकुट*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये मदर तेरेसा स्कूलच्या दोन खेळाडूंची निवड, मदर तेरेसा स्कूल च्या दोन खेळाडूंना सुवर्ण पदकाचा मुकुट*
*राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये मदर तेरेसा स्कूलच्या दोन खेळाडूंची निवड, मदर तेरेसा स्कूल च्या दोन खेळाडूंना सुवर्ण पदकाचा मुकुट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-किक बॉक्सिंग स्पोर्टसअसोसिएशन पुणे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल महाराष्ट्र राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 ते 29 जून पुणे येथे करण्यात आले होते. त्या स्पर्धेत येथील सेंट मदर तेरेसा स्कूल च्या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 17 वर्षा आतील 75 ते 80 किलो वजन गटात गौरव विपीन तिवारी याने सुवर्ण पदक प्राप्त केले तर 40 ते 45 किलो वजन गटात मध्ये अक्षय भरत सोनार याने सुवर्ण पदक मिळवून शाळेचे नाव उंच केले. तसेच चेन्नई (तामिळनाडू) येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर निवडी बद्दल जिजामाता शिक्षण संस्थेचे चेअरमन श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे सचिव डॉ. अभिजीत मोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले. यावेळी सेंट मदर तेरेसा हायस्कूल च्या मुख्याध्यापिका तेजस्वीता वसावे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.