*नंदुरबार गवळी समाजातर्फे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार गवळी समाजातर्फे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन*
*नंदुरबार गवळी समाजातर्फे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील गवळी समाजा करिता स्वतःचे भव्य मंगल कार्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध होणेबाबत गवळी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांना नंदुरबार गवळी समाजातर्फे निवेदन देण्यात आले.
गवळी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार सुनिल तटकरे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त गवळी समाजातर्फे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार केल्यानंतर निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गवळी समाज राज्य कार्यकारणी सदस्य महादू हिरणवाळे, लक्ष्मण यादबोले, आनंदा घुगरे, हेमंत नागापुरे, सुदाम हिरणवाळे उपस्थित होते. ऐतिहासिक नंद गवळी राजा यांच्या नंद नगरीत सहर्ष स्वागत ! भगवान श्रीकृष्णाचे वंशज असलेल्या आणि भटक्या जमातीचे गवळी समाज बांधवांचा नंदुरबार येथेही पारंपारिक दुग्ध व्यवसाय आहे. हातमजुरी आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या या वंचित गवळी समाज बांधवांथंसाठी नंदुरबार शहरात स्वतःच्या हक्काचे भव्य मंगल कार्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावे. अल्पउत्पन्न भूधारक असलेल्या गवळी समाज बांधवांना लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी लॉन्स अथवा भवन घेणे परवडत नाही. निवेदन स्विकारल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.