*इ पी पी एस शाळेत चिमुकल्यांतर्फे विठ्ठल नामाचा जयघोष*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इ पी पी एस शाळेत चिमुकल्यांतर्फे विठ्ठल नामाचा जयघोष*
*इ पी पी एस शाळेत चिमुकल्यांतर्फे विठ्ठल नामाचा जयघोष*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील कलेक्टर ऑफिस जवळ असलेल्या इ पी पी स्कूलमध्ये शनिवार रोजी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन केले. यावेळी चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला.दिंडीत विठ्ठल रुखमाई, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांच्या वेशभूषेत विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. सदर दिंडी शाळेच्या प्रांगणातून एसपी ऑफीस कॅम्पसच्या शिवमंदिरापर्यंत जाऊन दिंडीची सांगता करण्यात आली. यावेळी भक्तीच्या गजरात विद्यार्थीनी शिक्षक, रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील प्राचार्या सौ.शितल घुगे, समुपदेशक सौ. आकांक्षा तिवारी, यांनी केले. दिंडीच्या यशस्वितेसाठी वर्ग शिक्षिका कु.सानिया मिर्झा, सौ.शुभांगी गव्हाणे, सौ.दिपाली श्रॉफ, सौ.धनश्री पाटील, सौ. अंकिता चौधरी, सौ.मनिषा गावित, कु. निकिता पवार, कु.मानसी पवार, कुणाल साळवे, दानिश पठाण, सौ. जयश्री गुरव, सौ. लक्ष्मी चव्हाण यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका सौ. योगिता माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.