*खा.एड.गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, अखेर उधना मिरज रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रवाना*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खा.एड.गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, अखेर उधना मिरज रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रवाना*
*खा.एड.गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश, अखेर उधना मिरज रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रवाना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेस पक्षाचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी उदना नंदुरबार, जळगाव,पंढरपूर, मिरज, या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला होता. आज अखेर या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून आज रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबली आणि रेल्वे गाडीचे चालक यांच्या सत्कार खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले असून सदर रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी नगरसेवक देवाजी चौधरीमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावरशा कादरशा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी के पाडवी. दत्तू पवार, खंडेराव पवार, पंडित तडवी रोजगार स्वयंरोजगार सेलचे प्रदेश चिटणीस टी. आर खान आप्पा वाघ, संजय सोनवणे, सुमीता वळवी, देविदास वळवी, योगेश चौधरी आणि रेल्वे डिपार्टमेंटचे अधीक्षकसह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.