*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ उत्साहात साजरा-सुंदरसिंग वसावे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ उत्साहात साजरा-सुंदरसिंग वसावे*
*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ उत्साहात साजरा-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, 26 जून रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात ‘सामाजिक न्याय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र भदाणे, अनिसचे बलदेव वसईकर, सीताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, विवेक चव्हाण, दीपक पाटील, सचिन जगताप, हेमंत बिरारी, शंकर महाजन, विजय गिरासे, योगेश भामरे, तन्मय वळवी, कैलास देशमुख, मीनाक्षी दांडवेकर आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात समता दिंडीने झाली, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी पत्रे व लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, रमाई आवास योजना, जात वैधता प्रमाणपत्र आणि वसतिगृह प्रवेश पत्र यांसारख्या योजनांचा समावेश होता. तसेच, 10 वी आणि 12 वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेसाठी रवींद्र बोरसे, प्रवीण सावंत, भरत माळी, आणि माधुरी बोरसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पवार यांनी केले, तर कैलास देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास युवा प्रशिक्षणार्थी, बी. व्ही.जी., क्रिस्टल कर्मचारी तसेच विविध शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.