*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
*जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टलवर सुविधा उपलब्ध- सुनील वारे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टल विकसित केले असून यावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुण्याचे महासंचालक तथा सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक सुनील वारे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव व विमाप्र (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 आणि त्याअंतर्गत नियम 2012 नुसार, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केला असून समितीमार्फत प्रस्तावासोबत आवश्यक दस्तावेज व पुरावे इ. स्वरुपात जोडलेले आहेत अथवा प्रस्ताव अपूर्ण आहे याची खात्री करुन संबंधीत अर्जदारास अधिकचे पुरावे प्रस्तावासोबत सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते. यासाठी अर्जदारांच्या सोयीसाठी आता ऑनलाईन पोर्टलवर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: 1 ऑगस्ट 2020 पासून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. यात अर्ज डाउनलोड करणे, सादर केलेला अर्ज ट्रॅक करणे, त्रुटींची ऑनलाईन पूर्तता करणे आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवणे इत्यादी सुविधांचा समावेश आहे.
ऑनलाईन सेवा शुल्क भरण्याची सुविधा: 12 डिसेंबर 2020 पासून अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने सेवा शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिलॉकर सुविधा (Digi-locker) : जात वैधता प्रमाणपत्र डिजिलॉकरच्या माध्यमातून अर्जदार कुठेही, कधीही मोबाईलवर पाहू शकतात. ई-मेलद्वारे प्रमाणपत्र प्राप्त करणे: समित्यांकडून निकाली काढलेले वैध प्रमाणपत्र ई-मेलद्वारे अर्जदारास प्राप्त होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मदत आणि मार्गदर्शन: अर्ज भरताना अर्जदारांना सचित्र मदत/मार्गदर्शन आणि समर्पित हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
टोल फ्री क्रमांक: 24x7 सीएम हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक: 1800 120 8040. व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक: 9404999452.
हेल्पडेस्क ईमेल पत्ता helpdesk@barti.in. त्रुटी पूर्ततेसाठी सूचना: सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित अर्जांवर विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत एसएमएस/ई-मेल/पत्राद्वारे संबंधित समित्यांमार्फत कळविण्यात येते.
वरील सोयीसुविधा पोर्टलवर उपलब्ध असून सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित अर्जांवर विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत एसएमएस, ईमेल व पत्राद्वारे कळविण्यात आले असूनही अनेक अर्जदार/विद्यार्थी आणि पालकांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नाही. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव व विमाप्र (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 आणि त्याअंतर्गत नियम 2012 नुसार, अर्जावरील त्रुटी पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची आहे.
यासाठी संबंधित अर्जदार/पालक यांनी त्यांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तात्काळ समितीशी संपर्क साधावा आणि त्रुटींची पूर्तता करावी, असेही आवाहन धुळे व नंदुरबार जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष उन्मेश महाजन यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.