*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-21 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजरभवाली येथील प्रांगणात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील दिवसाचे औचित्य साधून शाळा स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी आणि अंगणवाडीच्या सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालन आणि गुजर भवाली प्राथमिक शाळेतील प्रवेशित 100% विद्यार्थी यांनी योगशिक्षक नितेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक सरला नाईक आणि सहाय्यक शिक्षिका मंगल कोकणी यांनी केलेल्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांकडून व उपस्थित पालक अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत विविध योगासने करून कडून खडे आणि बैठे योग प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय सहाय्यक शिक्षक नितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योगासनाबाबत महत्व पटवून सांगितले. योगामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढवून आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण होते. शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलनासाठी योग उपयुक्त ठरतो म्हणून या दिवसांनिमित्त शाळास्तरावर विविध प्रकारचे योगासने, कपाल भारती, अनुलोम- विलोम, भस्रीकासह झूम्बा डान्सचे विद्यार्थ्यांसह पालक अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आली. सदरील दिवशी स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांचा सुद्धा सहभाग यामध्ये घेण्यात आला. केवळ एक दिवस योगदिन साजरा न करता दररोज योगा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रोत्साहन मिळावे. योगाबाबत व्यक्ती व समाजामध्ये सर्वदूर जनजागृती निर्माण व्हावी त्याच्या माध्यमातून समाजात बंधुभाव वाढीस लागून शांतता नांदवी म्हणून. शाळास्तरावर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या समक्ष मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद गुजर भवाली शाळेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.