*परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी 04 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी 04 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात*
*परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी 04 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे विभागाच्या दि.30 डिसेंबर 2024 व दि. 31 डिसेंबर 2024 रोजी टाटा कंन्सल्टींग सर्विसेस (T.C.S.) कंपनी मार्फतीने महाराष्ट्रात वरोष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या दोन पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेसाठी नंदुरबार जिल्हयातील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी, आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविदयालय, नंदुरबार येथील केंद्रावर चार सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येऊन त्यामध्ये एकुण 231 परीक्षाथीनी परीक्षा दिली होती. त्याअनुषंगाने दि. 24 मे 2025 रोजी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य (F.D.A.) येथे सहायक आयुक्त (औषधे) या पदावर सध्या नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या श्रीमती, अश्विनी विजयकुमार जमादार, वय-47 वर्षे, ह.मु. सिटी पार्क, नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 327/2025 भा.न्या. संहिता कलम 318 (4), 238 सह महाराष्ट्र विदयापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणा-या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 5, 7, 8 प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरुन सदर नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी, आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविदयालय येथील सदर परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या नमुद दोन्ही पदांच्या ऑनलाईन परीक्षेत परीक्षार्थी रोहित संजय सुर्वे, रा. साक्री, धुळे, साक्षी कृष्णा सोनवणे, रा. आमठाणा, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर, जयेश प्रविण पाटील, रा. नंदुरबार, प्रितम युवराज बोरसे, साक्री, जि.धुळे, दिव्येश बाजीराव पाटील, रा. नंदुरबार अशांनी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीत प्रथम आले असल्याने व त्यांची पेपर सोडवण्याची पद्धती संशयास्पद वाटल्याने त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांनी TCS कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्याअन्वये सदर परीक्षेबाबतची चौकशी पूर्ण करुन TCS कंपनीतर्फे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार फिर्यादी यांनी नंदुरबार जिल्हयातील परीक्षा केंद्रावरील वर नमुद परीक्षार्थी व TCS चे नियुक्त अधिकारी तसेच परीक्षा केंद्र संबंधित महाविदयालयाचे मुख्याध्यापक यांनी परीक्षेत संगनमत करुन गैरप्रकार केला व महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली म्हणून तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असांना वर नमुद परीक्षा केंद्रावर TCS कंपनी मार्फत परीक्षेसाठी नियुक्त प्रतिनिधी सुहास संभाजी चोरावत (Venue Command Officer) रा. हातकणंगले जि. कोल्हापुर, अनिल रमेश पवार (Invigilator), रा. नंदुरबार, राहुल जगन्नाथ वाडीले (TCS-MTOE), रा. शिंदखेडा जि. धुळे त्याचप्रमाणे नंदुरबार येथील परिक्षा केंद्र असलेल्या संस्थेचे मुख्याध्यापक सुरेंद्र भिलाजी पाटील रा. नंदुरबार अशांनी मिळून परिक्षेत गैरप्रकार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याअन्वये पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सदर परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नमुद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे स्वतः करीत आहेत.