*रिंगणे पेडणेकर वाडी येथील श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे "सारिका समीर सारंग" या नाट्य प्रयोगाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिंगणे पेडणेकर वाडी येथील श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे "सारिका समीर सारंग" या नाट्य प्रयोगाचे आयोजन*
*रिंगणे पेडणेकर वाडी येथील श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे "सारिका समीर सारंग" या नाट्य प्रयोगाचे आयोजन*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील रिंगणे पेडणेकरवाडीतील नावेरी नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री हनुमान मंदिरास पुढील वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने सादर होणारे दर्जेदार नाटक, भजन, कीर्तन, पालखी नृत्य असे कार्यक्रम असलेल्या या जत्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना तीनही दिवस महाप्रसादाची सोय असल्याने उभ्या रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवाचा नावलौकिक आहे.
शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणास पूरक असलेल्या पद्धतीने लाकडाचा उपयोग करून बांधलेली सुंदर व हवेशीर वास्तू जिर्ण झाल्याने तिच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 22 जून 2025 रोजी सका. 11 वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे 'सारिका समीर सारंग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सदर नाटकाला आपण कुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित राहून जिर्णोद्धार निधी संकलनासाठी हातभार लावावा अशी विनंती
श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, रिंगणे- पेडणेकरवाडीतर्फे विश्वस्त सुभाष लाड यांनी केली आहे.