*सामाजिक बांधिलकीचा वसा जपत सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापनदिन साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सामाजिक बांधिलकीचा वसा जपत सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापनदिन साजरा*
*सामाजिक बांधिलकीचा वसा जपत सह्याद्री कोकण सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापनदिन साजरा*
पुणे(प्रतिनिधी):-सह्याद्री कोकण सामाजिक संस्था पुणे, गेली 8 वर्षे सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य असे योगदान देत यावर्षी संस्थेने वडगाव बुद्रुक, पुणे येथील नवरत्न ओल्ड ऐज होम या संस्थेला भेट देऊन साजरा केला तेथील सर्व वृद्ध मायमाऊलींशी संवाद करून त्यांचा आशिर्वाद घेण्याचे कार्य संस्थेच्या शिलेदारांकडुन करण्यात आले, त्या माऊलींची सेवा करणार्या सौ. अनिता राकडे, मंगेश कडू, वरिष्ठ Mecb अधिकारी मनोहर कोलते यांच्या कडून रीतसर माहिती मिळाली. ईतक्या वर्षाच्या सामाजिक कार्यात आजचा दिवस अविस्मरणीय क्षण म्हणुन कायम आठवणीत राहील असा होता. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र नवेले, सचिव सुनील डीके, तसेच संदीप सुर्वे, महेंद्र जंगम, संतोष वणगे, संदीप वणगे, लक्ष्मण जाडे, अमोल चिनकटे, दत्ता चिनकटे, रोशन ओकटे सौ. आरोही ओकटे आदी सभासद उपस्थित होते.