*छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मार्फत जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान सोहळा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मार्फत जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान सोहळा*
*छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मार्फत जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान सोहळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व विमलताई बटेसिंग रघुवंशी परिचारिका महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिन 12 मे रोजी साजरा करण्यात आला. 12 मे जगभरात जागतिक परिचारिका दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परिचारिकांचे आरोग्य क्षेत्रात असलेले महत्त्वाचे स्थान व त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्याचा हा दिवस. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी व छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व विमलताई बटेर्सिंग रघुवंशी नर्सिंग कॉलेज मार्फत परिचारकाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. सदरील कार्यक्रमास छत्रपती हॉस्पिटलच्या अदिसेविका सुमन बिरारी व जिल्हा रुग्णालयातील डॉ. अजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व प्रथम वर्ष B. Sc. नर्सिंग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आले. नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. भूषण ठोंबरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व प्राध्यापिका योगिनी सपकाळे यांनी परिचारिका दिनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी व परिचारिकांना सांगितले. छत्रपती हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या अश्विनी कदम यांना उत्कृष्ट परिचारिका म्हणून गौरवण्यात आले तर उत्कृष्ट विद्यार्थी परिचारिका म्हणून विद्या पावरा या प्रथम वर्ष बीएससी नर्सिंग विद्यार्थिनीला महाविद्यालयामार्फत पारितोषिक देण्यात आले. रघुवंशी नर्सिंग महाविद्यालय मार्फत आयोजित नर्सिंग सप्ताह मधील विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रथम वर्ष विद्यार्थी सावंन वळवी, सौरभ मोरे, विद्या पावरा, लक्ष्मी पाडवी, मुक्तेश्वरी, निषिकेश वैद्य, संदीप वसावे आदी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. छत्रपती हॉस्पिटलच्या अधिसेविका सुमन बिरारी यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रुग्णसेवा करत असताना प्रामाणिकपणा व नर्सिंग गुणधर्मांचे पालन करावे असे सांगितले. डॉ.अजय पाटील यांनी स्वरचित कविते मार्फत परिचारिकांचे आरोग्य क्षेत्रामधील महत्व अधोरेखित केले व उपस्थित परिचारिका व नर्सिंग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. प्रा. भूषण ठोंबरे यांनी ग्रामीण व आदिवासी भागात काम करत असताना परिचारिकांना येणाऱ्या विविध अडचणीवर त्यांनी कशाप्रकारे सामोरे जावे व विशेषता ग्रामीण भागात रुग्ण सेवा करताना परिचारिकांनी अतिशय जबाबदारीने काम करावे असे सांगितले. तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासूनच अभ्यास करत असताना थेरी बरोबरच क्लिनिकल प्रॅक्टिसेस कडेही विशेष लक्ष द्यावे याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रवेश वसावे व शिक्षिका अंजली तडवी यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी छत्रपती हॉस्पिटलचे समन्वयक समाधान पाटील व रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयाचे शिक्षक भूषण वळवी, मधुर वळवी, शंकर वसावे, सोनल गावित व शिक्षकेतर कर्मचारी आकाश शिंदे, विवेक मराठे यांनी विशेष मेहनत घेतली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.