*शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हयातील सराईत फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, गोवा राज्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात यश, आरोपीविरुध्द परराज्यात देखील गुन्हे दाखल असू

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हयातील सराईत फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, गोवा राज्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात यश, आरोपीविरुध्द परराज्यात देखील गुन्हे दाखल असू
*शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हयातील सराईत फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, गोवा राज्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात यश, आरोपीविरुध्द परराज्यात देखील गुन्हे दाखल असून जिल्हयाभरात आतापावेतो एकुण 08 गुन्हे दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार पोलीस अधीक्षकश्रवण दत्त. एस यांनी जिल्हयातील अवैध धंदयांवर वेळोवेळी कारवाई करणे तसेच जिल्हयाभरातील शरीराविरुध्दचे तसेच मालमत्ताविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या पाहीजे फरार आरोपींचा शोध घेणेबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी सुचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने 6 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शरीराविरुध्दच्या तसेच मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयातील सराईत फरार असलेला आरोपी नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या पाडवी, रा.कात्री, ता.धडगाव हा सध्या गोवा येथील कलंगुड परीसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथक रवाना केले. सदर स्था.गु.शा. पथकाने गोवा राज्यातील स्थानिक पोलीसांच्या मदतीने कलंगुड परिसरात जाऊन सराईत आरोपी नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या पाडवी याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे पूर्ण नाव राज्या ऊर्फ नाकक्षा ऊर्फ नागेश दमण्या पाडवी, वय 27 वर्षे, रा.कात्री, ता. धडगाव जि. नंदुरबार असे सांगितले. सदर सराईत फरार आरोपी याच्याविरुध्द नंदुरबार जिल्हयात शरीराविरुध्दच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे एकुण 8 गुन्हे दाखल असून परराज्यात देखील सदर आरोपीवर विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असुन त्यास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनिरीक्षक मुकेश पवार, पोहेकों/सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना मोहन ढमढेरे, पोशि यशोदिप ओगले अशांनी केली आहे.