*नंदुरबार जिल्ह्यातील नागन प्रकल्पाच्या 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील नागन प्रकल्पाच्या 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता*
*नंदुरबार जिल्ह्यातील नागन प्रकल्पाच्या 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नागन मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत आहे. नागन मध्यम प्रकल्पातून तापी खोरेतील नागन नदीवर एकूण 26.48 दलघमी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. हा प्रकल्प भरडू गावाजवळ आहे. या प्रकल्पामुळे नवापूर तालुक्यातील 16 गावातील 2 हजार 486 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेंतर्गत 161 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.