*विश्वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन*
*विश्वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन*
नांदेड(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शासकीय कार्यालयासाठी 100 दिवसाच्या कृती आराखड्या बाबतच्या निर्देशानुसार धर्मादाय सह आयुक्त नांदेड यांनी 5 एप्रिल शनिवार रोजी विश्वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्या बाबतच्या निर्देशानुसार तसेच अमोघ कलोती धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादायसह आयुक्त नांदेड, धर्मादाय वकील संघ, पुरोगामी धर्मादाय वकील संघ नांदेड व ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरू नगर नागलगाव ता. कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्तांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे 5 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत होणार. या कार्यशाळेचे अध्यक्ष श्रीमती हिरा का. शेळके तर डॉ. विजय पवार सचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरूनगर नागलगाव हे प्रमुख अथिती आहेत. कार्यशाळेत आयकर कायदा व कंपनी कायद्यातील सार्वजनिक न्यासाबाबतच्या तरतुदी या विषयावर मनोहर आयलाने, सनदी अधिकारी, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था या विषयावर अॅड. जयवंत गजभारे, कलम 41 ए अंतर्गत धर्मदाय आयुक्तांकडे निर्देश मागण्याची तरतूद या विषयावर अॅड. चंद्रशेखर नरवाडे, धर्मादाय कार्यालयातील कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबतचे मार्गदर्शन अॅड. व्यंकटेश पवार, अशा विविध वक्त्यांचे न्यासासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त न्यासांच्या विश्वस्तांनी या कार्यशाळेत उपस्थित रहावे व विविध विषयांच्या माहितीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती ममता यो. राखडे धर्मादाय उप आयुक्त व श्रीमती वैशाली वी. चौधरी सहा. धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी केले आहे.