*महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक स्वमग्नता (ऑटिझम)दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक स्वमग्नता (ऑटिझम)दिन उत्साहात साजरा*
*महेंद्रा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक स्वमग्नता (ऑटिझम)दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महेंद्रा पब्लिक स्कूल आणि ब्लू सोल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑटिझम दिन (2 एप्रिल) विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजात ऑटिझमबद्दल जागरूकता निर्माण करणे, विशेष मुलांच्या (Special Children) क्षमतांना वाव देणे आणि पालकांना त्यांच्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन प्रदान करणे असे होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये बालरंगभूमी परिषद, मुंबईचे सचिव नागसेन पेंढारकर, सुंदरदे बीटचे केंद्रप्रमुख एल. जी. देसले, नळवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती दक्षा बैसाणे, प्रसिद्ध डॉ. चैताली देसाई, महेंद्रा पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पिनल शाह, शाळेचे प्राचार्य अरुण पाटील आणि कु. रश्मी यादव यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली, ज्याने उपस्थितांचे मनोबल उंचावले. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, व इतर उपक्रम सादर केली. विशेषतः, ऑटिझम असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी बनले.
डॉ. चैताली देसाई यांचे पालकांसाठी विशेष मार्गदर्शन
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. चैताली देसाई यांचे मार्गदर्शन सत्र. त्यांनी ऑटिझम असलेल्या मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, त्यांच्या वर्तनाच्या वेगळ्या पद्धती आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याच्या तंत्रांवर पालकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. ऑटिझम हा केवळ एक वैद्यकीय किंवा मानसिक आजार नसून तो मुलांच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित एक वेगळा दृष्टिकोन असतो, हे त्यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केले. "या विशेष मुलांना आपण वेगळ्या नजरेने पाहू नये, तर त्यांच्यातील कौशल्ये ओळखून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे,"असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच, ऑटिझम असलेल्या मुलांसाठी योग्य शिक्षणपद्धती, त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पूजा लोहार यांनी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांनी मोलाचे योगदान लाभले.