*महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल 2025 रोजी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल 2025 रोजी*
*महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल 2025 रोजी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी होत आहे. सदर निवडणुकीचे मतदान 3 एप्रिल 2025 रोजी स. 8 ते सायं. 5 दरम्यान होणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने SLP N०.8576/ 2025 या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिका-यांऐवजी नवीन निर्वाचन अधिकारी तात्काळ नियुक्त केल्यास निवडणुक प्रक्रीया पुढे सुरू ठेवता येईल असे निर्देश दिनांक 2 एप्रिल 2025 च्या आदेशान्वये दिलेले आहेत. सदर आदेश विचारात घेता, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुका घेण्याकरीता सुनिलकुमार धोंडे, अवर सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय निवडणूक- 2025 च्या अनुषंगाने सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायींकाना कळविण्यात येते की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच, गुरुवार दि. 3 एप्रिल, 2025 रोजी होणार आहे. तरी सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे.