*नंदुरबारात छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार-आमदार चंद्रकांत रघुवंशी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारात छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार-आमदार चंद्रकांत रघुवंशी*
*नंदुरबारात छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार-आमदार चंद्रकांत रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रेरणा मिळावी. भावी पिढीला त्यांच्या आदर्श निर्माण व्हावा यासाठी शहरात संभाजी महाराजांचं स्मारक साकारण्यात येईल असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.
सकल मराठा समाजाच्या वतीने आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सेना भवनात (आमदार कार्यालय) सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे आ. रघुवंशी म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी स्मारक किंवा पुतळा बसवण्यासाठी प्रशासन परवानगी देत नाही. पुतळा बसवण्यासाठी शासनाचे अनेक निकष असून, उच्च न्यायालयाचे देखील या संदर्भात अनेक निकाल आहेत.
पालिकेची वास्तू असलेल्या नाट्य मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराणा प्रताप यांच्या पुतळा पालिकेच्याच जागेवर उभारण्यात आला आहे व त्याची सर्वस्वी संरक्षणाची जबाबदारी नगरपालिकेने घेतली आहे. याच धर्तीवर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येईल. जनतेने विकास कामांमध्ये साथ दिली पाहिजे. नंदुरबार शहर इतर शहरांच्या मानाने विकास कामांमध्ये आघाडीवरच आहे. शहरात आजही बंधुभाव टिकून राहिलेला आहे. अशावेळी नागरिकांचे सहकार्य अभिप्रेत आहेत. माझ्याकडे काम घेऊन आलेला व्यक्तीचे मी कधीही त्याचे नाव,जात धर्म कधीही विचारत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नंदनगरीच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे एकत्र आले पाहिजे. सत्कार प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.