*नंदुरबार शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी*
*नंदुरबार शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील इस्लाम धर्माच्या सर्वात मोठा सण म्हणजे ईद-उल- फित्र रमजान ईद होय. दिनांक 31 मार्च 2025 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता नंदुरबार शहरातीलईदगाह मैदान येथे पवित्र ईद-उल-फित्र रमजान ईदचे नमाज पठण हाजी हाफिज अब्दुल्ला यांनी केले, शेवटी अक्कलकुवा येथील हजरत मौलाना हुजेफा यांनी परमेश्वरांची दुवा पठण केली, या नमाज पठनानंतर विविध पक्षातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली, तसेच एकमेकांना शुभेच्छा देऊन आलिंगन गळाभेट केली, यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यानिमित्ताने दिसून आला, एकमेकांना बंधूभाव अंतर्गत देशात जातीवाद्यांना चपराक बसली आहे, यावेळी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, एजाज बागवान राज्य महासचिव ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटी नई दिल्ली, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, मोहन माळी माजी नगरसेवक, कैलास पाटील पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती, सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रॉफ, रऊफ शहा माजी पोलीस उपनिरीक्षक, सय्यद मकसूद उपाध्यक्ष सदा जनसेवा फाउंडेशन, शरीफ खाटीक माजी पोलीस उपनिरीक्षक, हाजी लियाकत पठाण माजी नगरसेवक, रियाज कुरेशी, इकबाल खाटीक, सय्यद इसरार रोटरी क्लब अध्यक्ष नंदुरबार, अल्ताफ मेमन, लियाकत बागवान, फारूक मेमन आदींची उपस्थिती होती.