*पथराई येथे आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीमार्फत महिला शिक्षिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पथराई येथे आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीमार्फत महिला शिक्षिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण*
*पथराई येथे आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीमार्फत महिला शिक्षिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावतर्फे पथराई येथील के.डी गावित शैक्षणिक संकुल येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लायन्स फेमिना क्लबचे अध्यक्ष मीनल म्हसावदकर, लायन्स फेमिना क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ तेजल चौधरी, डॉक्टर काने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, प्रमिला चौधरी, आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, संचालिका इला गावित, आदिवासी युवक विकास व क्रीडा मंडळ नटावदच्या सचिव विभूती गावित, आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी च्या
सचिव ऋषिका गावित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम कुलदेवता देवमोगरा माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मातृत्व शक्ती जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर अशी सजावट सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते यासाठी के डी गावित ए एन एम व जी एन एम कॉलेजच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. त्यांना सचिव ऋषिका गावित यांनी मार्गदर्शन केले. याच दरम्यान आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद या संस्थेचे नंदुरबार जिल्ह्यातील विस्तृत कार्य व विद्या शाखांचा परिचय रजनी करेले यांनी करून दिला. त्यानंतर अतिथिनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले प्रेरणादायी कार्य, भूषविलेले पदे व त्यांना मिळालेले पुरस्कार अतिथी परिचयातून प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाची उल्लेखनीय बाब म्हणजे यात महिलांसाठी रॅम्प वॉक, नृत्य व अनेक आनंददायी फनी गेम्स घेण्यात आले. यात सर्व महिला कर्मचाऱ्यांनी उस्फूर्त असा सहभाग नोंदविला. स्पर्धेनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सीमा मोडक यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले व व्यवस्थापन मंडळाची खूप कौतुक केले. आपल्या मनोगतात ऋषिका गावित यांनी सर्व प्रमुख अतिथीकडून आपणही प्रेरणा घ्यावी व उत्तुंग असे कार्य करावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन के डी गावित सैनिकी विद्यालय पथराई येथील श्रीमती रजनी करेले यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन सचिव माननीय ऋषिका गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीतील सर्व विद्या शाखांच्या महिला शिक्षकांनी केले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.