*टुकी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा, को-या चेकवर सही, विना काम करून निधीचा अपहार केल्याचा उपसरपंचाचा आरोप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टुकी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा, को-या चेकवर सही, विना काम करून निधीचा अपहार केल्याचा उपसरपंचाचा आरोप*
*टुकी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा, को-या चेकवर सही, विना काम करून निधीचा अपहार केल्याचा उपसरपंचाचा आरोप*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, ग्रामपंचायत टुकी चे उपसरपंच दिलीप मुसळदे, सुरेश पवार उपसरपंच ग्रामपंचायत लोहारा, रामदास मुसळदे सदस्य ग्रामपंचायत लोहारा आदि कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच, ग्रामपंचायत टूकी ता. शहादा यांनी दामू चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टूकी यांनी 15 व्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, म्हणून दिनांक 5 जुन 2024 रोजी तक्रार स्मरणपत्र सादर केलेले आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टूकी यांनी पुन्हा दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचार रोखण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे. तरी सदर तक अर्जावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हा अध्यक्ष, बिरसा फायटर्स नंदूरबार यांना उपसरपंच ग्रामपंचायत टूकी यांनी दिनांक 24 मार्च 2024 रोजी तक्रार अर्ज दिलेला आहे. उपसरपंच ग्रामपंचायत टूकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टूकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहेत, भ्रष्टाचार करीत आहेत. ग्रामसेवक यांनी दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी 15 व्या वित्त आयोगातून डीएससीने बिना काम करता एकुण दोन लाख साठ हजार रूपये (260000)काढले आहेत. तसेच ग्रामपंचायत टूकी येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत. को-या चेकवर सह्या घेऊन निधी हडप करीत आहेत. उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे. तरी ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी. अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास पंचायत समिती शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे.