*श्री काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वर्षभर शालेय व आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात, अशा यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हिरा प्रतिष्ठान संचालित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून विद्यामंदिरात वर्षभरात राबवलेले उपक्रम त्यात शाळा प्रवेशोत्सव, वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स, आर्ट ऑफ लिविंग, बाल संस्कार केंद्र,क्रीडास्पर्धा,आनंदमेळावा अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी तसेच आई वडील हेच आपले आत्मगुरू असून त्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे असे सांगत शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत चांगले संस्कार घडावेत यावर आमचा भर असल्याची माहिती दिली त्यासाठी बदलत्या काळानुसार शैक्षणिक गरजा ओळखून त्यानुसार विविध शैक्षणिक, अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवणारी व यशस्वी वाटचाल करणारी उपक्रमशील शाळा म्हणून काम करण्याचे आमच्या शाळेचे ध्येय आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे म्हणत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून नंदुरबार जिल्हा परिषद वेतन अधीक्षक भगवान कोळपे, सहाय्यक संशोधन अधिकारी भिकन भोये, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद चव्हाण, कृष्णा राठोड, वनऊर्जा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक सचिन हाडस, सौ. संगीता गावित, सौ. अश्विनी गावित आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. प्रमुख मान्यवर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या नावीन्यपूर्ण गोष्टी तसेच उपक्रमांचे कौतुक केले तसेच पालक म्हणून आम्ही आमच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी खूप समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपशिक्षक सतिष काटके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत शाळेत वर्षभर राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोखा सादर केला तसेच शाळेची होणारी यशस्वी वाटचालीत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले व पुढेही शाळेच्या माध्यमातून नवनवीन तसेच अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येतील अशी सर्व शिक्षकांच्या वतीने ग्वाही दिली. बक्षीस समारंभात सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांना शाळेत राबवलेल्या उपक्रमांच्या क्षणचित्राची चित्रफित दाखवण्यात आली त्यानंतर शाळेने वर्षभरात राबवलेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी इयत्ता बालवाडी ते 4 थी पर्यंतच्या 150 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भामरे व आभार प्रदर्शन विशाल चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमिता नाईक, भारती मोरे, शेखर पाटील, रवी चौधरी, सुधाकर ठाकूर आदींनी सहकार्य केले.