*कोळदे येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा 100 टक्के निकाल-माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते गुणवंतांच्या सत्कार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोळदे येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा 100 टक्के निकाल-माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते गुणवंतांच्या सत्कार*
*कोळदे येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा 100 टक्के निकाल-माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते गुणवंतांच्या सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एनटीव्हीएसच्या कोळदे येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळाचा 12 वी कला व विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार संचालक,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळदे येथील 12 वी कला व विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला. शाळेत विज्ञान शाखेतून राजनंदिनी बागुल (86.50) प्रथम, सुमन वसावे (85.83) द्वितीय, संगिता वसावे (83.83) तृतीय आणि कला शाखेतून समीर वळवी (84.17) प्रथम, शीतक्षा नाईक, अविना पावरा (84.00) द्वितीय, अंजली अहिरे (83.00) तृतीय क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे संचालक, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या असे सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांच्यासह प्राध्यापक, गुणवंतांचे पालक उपस्थित होते.