*शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके तर सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके तर सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले*
*शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर जिल्हाप्रमुखपदी गणेश पराडके तर सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना शिंदे गटाची अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ क्षेत्राची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या गणेश पराडके यांची जिल्हा प्रमुख पदी वर्णी लागली आहे. तर सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी लक्ष्मण वाडीलेकडे सोपविण्यात आली आहे. कार्यकारणीत महिलांना महत्वपूर्णस्थान देण्यात आले आहे.
माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या जिल्हाप्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱयाचे लक्ष होते. गेल्या महिन्यात ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती गणेश पराडके यांना हि जबाबदारी देण्यात आली आहे. गणेश पराडके यांच्याकडे आधी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाचीही जबाबदारी होती. त्याच्या निवडीने धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये नवा जोश येणार असल्याचे चिन्ह आहेत. हिंदूहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, बुधवारी मुंबई येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कार्यकारिणी जाहीर केली. पदाधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र हे अक्कलकुवा विधानसभा मतदार संघ क्षेत्र असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. कार्यकारणीचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आ.चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी यांनी कौतुक केले आहे. जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी याप्रमाणे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले जिल्हाप्रमुख गणेश पराडके, उपजिल्हाप्रमुख मगन वसावे, अक्कलकुवा विधानसभा प्रमुख कान्हा नाईक, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, उपजिल्हा संघटक राजेंद्र वसावे, अक्कलकुवा तालुकाप्रमुख तुकाराम वळवी, अक्कलकुवा तालुका संघटक आनंदराव वसावे, मोलगी तालुकाप्रमुख जयवंत पाडवी, अक्कलकुवा शहर प्रमुख रवि चंदेल, खापर शहर प्रमुख रवी पाडवी, मोलगी शहर प्रमुख रामसिंग वळवी, महिला सेना जिल्हाप्रमुख सुनिता पाडवी, उपजिल्हाप्रमुख सिंधू वसावे, उपजिल्हाप्रमुख संध्या पाटील, उपजिल्हा संघटक दुर्गा पाडवी, अक्कलकुवा तालुका महिला सेना प्रमुख छाया वळवी, अक्कलकुवा तालुका महिला सेना संघटक कंचन पाडवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.