*टी. बी. हरेगा,देश जितेगा. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित महा बाईक रॅलीचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टी. बी. हरेगा,देश जितेगा. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित महा बाईक रॅलीचे आयोजन*
*टी. बी. हरेगा,देश जितेगा. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित महा बाईक रॅलीचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या (N.T. E. P.) वतीने क्षयरोगाच्या जनजागृती करिता महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोरेगाव (पश्चिम) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान येथे या महा रॅलीचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमांतर्गत 100 दिवस वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. शासनाच्या टी. बी. मुक्त भारत या अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईच्या उत्तर पश्चिम विभागात महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पी उत्तर विभागाचे सहायक पालिका आयुक्त कुंदन मोगी रामसिंग वळवी, माजी खासदार संजय निरुपम, जिल्हा क्षयरोग अधिकारी अर्चना चंदनशिवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी रीना राऊळ, महाराष्ट्र जनविकास केंद्र या संस्थेचे प्रमुख अकबर सैय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत महा बाईक रॅलीची सुरुवात झाली. यात महानगर पालिका तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या मार्गाने दीडशे बाईकधारी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पश्चिमेकडील लिंक रोडवरून निघालेल्या या रॅलीत क्षयरोगाच्या जनजागृतीकरिता टी. बी. हरेगा, देश जितेगा. भारत माता की जय. अशा घोषणा देण्यात आल्या. सहभागीनी जनजागृती करिता टी शर्ट, टोपी असा पेहराव केला होता. यावेळी द्रोणचाही वापर करण्यात आला. दहिसर येथील आय.सी कॉलनीतील पालिकेच्या गार्डन मध्ये या रॅलीचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी डॉ. ओमप्रकाश वल्लेपवार (डी. इ. एच. ओ), पी उत्तर विभागाच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी रीना राऊळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी अर्चना चंदनशिवे, महाराष्ट्र जनविकास केंद्राचे प्रमुख अकबर सैय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विभागातील आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग जनजागृतीकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच महा बाईक रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सहभागींना सन्मानपत्र देण्यात आली. यावेळी इन.टी.इ.पी. कर्मचारी, महाराष्ट्र जनविकास केंद्र, पी. पी,एस,ए., उमाना, नवनिर्माण समाज विकास केंद्र, एम. एल. एस.एम. या संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचा आनंद सर्वांनी घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी टी.बी. मुक्त भारत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत याकरिता सर्वांनी प्रतिज्ञा घेतली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.