*अपघात प्रवणठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा-बिरसा फायटर्स*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अपघात प्रवणठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा-बिरसा फायटर्स*
*अपघात प्रवणठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा-बिरसा फायटर्स*
शहादा(प्रतिनिधी):-अपघात होणा-या रस्त्याच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा, या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते भाऊ तात्या पेट्रोल पंप या डोंगरगाव रस्त्यावर एका भरधाव वेगात असलेल्या फाॅर्चूनर कारने रस्त्याने चाललेल्या एका माय लेकाला चिरडले आहे. या अपघातात सौ. कल्पना वाघ व आकाश वाघ या माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसविले असते तर हा अपघात टळला असता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात मोटारसायकल व चार चाकी वाहने ये- जा करतात. सकाळ, संध्याकाळ व रात्री या रस्त्यावर पायी फिरणा-या लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे अत्यावश्यक आहे.
ज्या ठिकाणी लोकांची रस्त्यावर जास्त वर्दळ असते, जिथे अपघात होतात व अपघात होण्याची दाट शक्यता आहे, अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे. पटेल रेसिडेन्सी ते भाऊ तात्या पेट्रोल पंप डोंगरगाव रोड, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा- लोणखेडा काॅलेज रोडवर (काॅलेज समोरील रस्त्यावर), शहादा खेतिया रोडवरील सुतगिरणी फाटा, अन्य अपघात प्रवण ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा, अशी बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे.