*नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजाचे गुरुवर्य सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरीत दाखल*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजाचे गुरुवर्य सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरीत दाखल*
*नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजाचे गुरुवर्य सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरीत दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिगंबर जैन समाजाचे गुरुवर्य सुखसागरजी महाराज यांची पदयात्रा नंदनगरी दाखल झाली. कर्नाटक ते व्हाया महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्यात ही पदयात्रा जाणार आहे. वीर शिरोमणी सुख सागरजी महाराज यांनी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून सुरू केलेली पदयात्रा मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर पर्यंत प्रवास होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मांगीतुंगी येथून निघालेली पदयात्रा मंगळवारी सकाळी नंदनगरीत दाखल झाली. याप्रसंगी नवापूर चौफुली येथून दिगंबर जैन समाजातर्फे महिला पुरुषांनी सुख सागरजी महाराज यांचे स्वागत केले. त्यानंतर भक्ती गीतांनी बँड वाद्याच्या तालासुरात पदयात्रा साक्री नाकामार्गे कोहिनूर टॉकीज, बाबा गणपती परिसर, टिळक रोड, सोनार खुंट, गणपती मंदिर चौक, माणिक चौक मार्गे दिगंबर जैन मंदिरात समारोप झाला.
दिगंबर जैन समाजाचे आद्य गुरु प्रातःस्मरणीय संत शिरोमणी आचार्य 1008 श्री विद्यासागरजी महामुनिराज महाराज यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त
मंगळवार 18 फेब्रुवारी योगायोगाने पदयात्रा नंदनगरीत आली. हे औचित्य साधून
सुख सागरजी महाराज यांच्या सानिध्यात जैन मंदिर येथे विधान, आरती आणि विविध धार्मिक उपक्रम झाले. बँडवरील भक्ती गीतांनी शहर वासीयांचे शोभायात्रेद्वारे लक्ष वेधून घेतले. पदयात्रा यशस्वीतेसाठी दिगंबर दिन समाज महिला पुरुष युवक आणि युवती यांनी परिश्रम घेतले. शोभायात्रा मार्गावर शहर पोलीस तसेच वाहतूक शाखा आणि गृह रक्षक दल जवान होमगार्ड यांनी सहकार्य केले.