*प्रा .डॉ.माधव कदम टोबॅको फ्री नॅशनल अवॉर्डने सन्मानित*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रा .डॉ.माधव कदम टोबॅको फ्री नॅशनल अवॉर्डने सन्मानित*
*प्रा .डॉ.माधव कदम टोबॅको फ्री नॅशनल अवॉर्डने सन्मानित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधव कौतिक कदम यांना नुकताच नरोत्तम सेखसरीया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि तंबाखू उत्पादने अधिनियम अंतर्गत तंबाखूमुक्त शालेय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रचार करण्यास मदत
करणाऱ्या व समाजामध्ये जनजागृती करण्याच्या कार्याची दखल घेऊन' टोबॅको फ्री इंडिया ' हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार मुंबई प्रेस क्लब मुंबई येथे नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे महाराष्ट्र राज्याचे कमिशनर डॉ. राजीव निवतकर यांच्या शुभहस्ते देण्यात आला. धनादेश, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन देशातील सात व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचवेळी डॉ. माधव कदम यांनी तंबाखूमुक्त अभियानाच्या अनुभवावर आधारित लिहिलेले आरोग्य संपन्न 'तंबाखूमुक्त अभियान एक चळवळ' या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण प्रसंगी मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च विभागाचे महाराष्ट्राचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर यांच्यासह मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र शासनाचे डेंटल विभागाचे सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक संचालक रिटा परवडे, सलाम मुंबई फाउंडेशनचे सीईओ नंदिना रामचंद्रन, नरोत्तम सेखसरीया फाउंडेशनचे सीईओ मनीष जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सलाम मुंबई फाउंडेशनचे दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. तर नरोत्तम सेखसरिया फाउंडेशनचे सीईओ मनीष जोशी यांनी फाउंडेशनच्या कार्याची ओळख करून दिली. पुरस्कर्त्यांचा परिचय सलाम मुंबई फाउंडेशनच्या मरीना यांनी करून दिला. यावेळी नरोत्तम सेख सरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. माधव कदम यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सलाम मुंबई फाउंडेशन आणि नव निर्माण संस्था यांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळांचे अभियान राबविण्यासाठी योगदान दिले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार दिला गेला. सलाम मुंबई फाउंडेशनचे अजय पिनलकर, दीपक पाटील, नाना धवसे, नवनिर्माण संस्था नंदुरबारचे अध्यक्ष रवी गोसावी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम.जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य एस. यु. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य टी, जी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.