*तळोदा शहर दोडेगुजर समाज संघटनेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा शहर दोडेगुजर समाज संघटनेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न*
*तळोदा शहर दोडेगुजर समाज संघटनेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न*
तळोदा(प्रतिनीधी):-तळोदा शहर दोडे गुजर समाजाच्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या 2025 च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यात कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ पाटील व प्रमुख मान्यवर रघुवीर चौधरी रा. मोरवड, नटवर पाटील रा. धानोरा, श्रावण चौधरी रा. मोरवड, हिम्मत पटेल रा.शेलु, सुरेश पटेल रा. बार्डोली, केदार चव्हाण रा. नंदूरबार, मुकुंद पाटील रा.मुंबई, अरुण पाटील रा. तळवे, प्रकाश पाटील रा. निंभोरा, रमाकांत पाटील रा. वाघोदा यांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा पार पडला. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे या मान्यवरांनी संपूर्ण दोडे गुजर समाज बांधवांना विनामूल्य दिनदर्शिका देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे सर्व समाजाकडून कौतुक करण्यात येत आहे. ह्या दिनदर्शिका यशस्वी करण्यासाठी तळोदा शहर दोडे गुजर समाज अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील, सचिव सोमनाथ पाटील, सदस्य युवराज चव्हाण, कृष्णदास पाटील, सागर पाटील, राहुल पाटील यांनी सहकार्य केले. उपस्थित ज्येष्ठ बन्सीलाल पाटील, राजेंद्र पाटील, हरीश पाटील, योगेश पाटील, दीपक पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते. प्रस्तावना सोमनाथ पाटील, मनोगत प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, हितेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार युवराज चव्हाण यांनी केले.