*नंदुरबार येथे होमगार्ड वर्धापन सप्ताह समारोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे होमगार्ड वर्धापन सप्ताह समारोप*
*नंदुरबार येथे होमगार्ड वर्धापन सप्ताह समारोप*
नंदुरबार(प्रतिनीधी):-होमगार्ड संघटनेच्या 78 व्यां वर्धापन दिनानिमित्त दिनांक 7 डिसेंबर 2024 ते 13 डिसेंबर 2024 दरम्यान वर्धापन सप्ताह साजरा करण्यात आला होता. यामध्ये कवायत व संचलन घेण्यात आले, दुग्ध विकास महामंडळ येथे परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, कर्णकार निवासी मतिमंद विद्यालय नंदुरबार येथील मुलांना फळे/बिस्कीट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, मनुदेवी फाउंडेशन संचलित मूकबधिर मुलांची शाळा येथील मुलांना फळे/ बिस्कीट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या अनुषंगाने होमगार्ड वर्धापन सप्ताह समारोप कार्यक्रम दि,13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10.00 वा. नंदुरबार होमगार्ड पथक कार्यालय येथे संपन्न झाला आहे. सदर समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समादेशक अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपस्थित होते. तसेच होमगार्ड पथकातील सर्व मानसेवी अधिकारी, पुरुष व महिला होमगार्ड हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा समादेशक कांबळे यांनी पथकातील सर्व होमगार्ड यांना कायदा व सुव्यवस्था हाताळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यातील एक महत्त्वाची अडचण म्हणजे सर्व होमगार्ड बांधव कडे हेल्मेट कसे उपलब्ध करता येतील यावर भर दिली व त्याच्या पाठपुरावा शासन स्तरावर देखील केला आहे असे संबोधित केले यावर आवर्जून कांबळे यांनी बोलून दाखवले सदर कार्यक्रमास जिल्हा होमगार्ड कार्यालयातील कर्मचारी वर्ग तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका समादेशक, पावबा मराठे, कंपनी कमांडर रावसाहेब पाटील, किशोर गोसावी व प ना, मनोज मराठे, मनोहर चौधरी, सुरज ठाकरे. प ना, आनंद पेंढारकर, उमाकांत वसईकर, गुलाब माळी, दिनेश महाजन, मुकेश राजभोज लिपिक, कैलास मोरे, खेडकर, संजय भोई व इतर होमगार्ड यांनी घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पलटण नायक मनोहर चौधरी यांनी केले.