*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत-सुंदरसिंग वसावे*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी सातबारा उताऱ्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमीहीन शेतमजुरांचे राहणीमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शेतजमीनीचे वाटप केले जाते. या योजनेंतर्गत एका लाभार्थी कुटुंबाला 2 एकर ओलीताखालील (बागायती) किंवा 4 एकर कोरडवाहू (जिरायती) याप्रमाणे लाभ मंजूर करण्यात येत असून बागायती जमिनीसाठी प्रती एकर रुपये 8 लाख व कोरडवाहू (जिरायती) जमिनीसाठी प्रती एकर रुपये 5 लाख इतके अनुदान शासनामार्फत देण्यात येते. ज्या नागरिकांना आपली शेती वरील दरानुसार विकायची असेल त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे शेतीचा अद्यावत सातबारा उताऱ्यासह अर्ज सादर करावा, असेही वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.