*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*
*स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत मर्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजकंना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व राष्ट्रीयकृत बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजकांनी 31 डिसेंबर, 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही सहाय्यक आयुक्त वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.