*16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन-विनोद वळवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन-विनोद वळवी*
*16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन-विनोद वळवी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-महिलांच्या तक्रारी,अडचणींची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दरमहा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून डिसेंबर महिन्यात 16 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता रंगावली सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत, असेही वळवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.