*टोल माफियांविरुद्ध लढणारे पहिले आंदोलक ‘साने गुरुजी’सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, कवी हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टोल माफियांविरुद्ध लढणारे पहिले आंदोलक ‘साने गुरुजी’सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, कवी हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन*
*टोल माफियांविरुद्ध लढणारे पहिले आंदोलक ‘साने गुरुजी’सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, कवी हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन*
शहादा(प्रतिनीधी):-मायमाऊली सानेगुरुजी हे खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक होते. श्रमिक शोषित, शेतकरी, शेतमजुर, कष्टकऱ्यांसाठी त्यांनी प्राणपणाला लावले, ब्रिटिशांविरुद्ध आग पेटविणारे त्यांचे संघर्षाचे तंत्र अभूतपूर्व होते. जनतेला त्यांनी प्रेम आणि संघर्ष शिकविले. समाज चळवळीपासून लांब गेला आहे,आज गुरुजी असते तर त्यांनी तापी नर्मदेच्या दऱ्याखोऱ्यात ठाण मांडून राहिले असते. गुरुजींनी जेथून लढा पेटविला त्या अमळनेरसह संपूर्ण खान्देशाकडे तिर्थक्षेत्र प्रेरक ठिकाण म्हणून पाहिले जाते. अमळनेर येथे जेव्हा ब्रिटिशकाळात नगरपालिकेने शेतकऱ्यांच्या वाहनातून विक्रीसाठी आलेल्या पिकविलेल्या मालाला जकात नाक्यांच्या माध्यमातून टोल घेणे सुरु केले तेव्हा गुरुजींनी टोलमुक्ती आंदोलन पेटवून पालिकेला टोल मागे घ्यायला भाग पाडले. साने गुरुजी हे खऱ्या अर्थाने टोल माफियांविरुद्ध आंदोलन पेटविणारे पहिले आंदोलक नेते होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, हेरंब कुलकर्णी यांनी ‘साने गुरुजी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत’ या विषयावर शहादा येथील विकास हायस्कुल येथे नर्मदा बचाव आंदोलन व विकास हायस्कूलच्या मदतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता परिषदेचे प्रमुख, ज्येष्ठ साहित्यिक, आंदोलक, वाहरुभाऊ सोनवणे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली. सूत्रसंचालन विष्णु जोंधळे व चेतन साळवे यांनी केले, आभार अनिल कुंवर यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विकास हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा पाटील, रंजना कान्हेरे, गो. पि. लांडगे, प्रा. जयपाल शिंदे, तारा मराठे हे होते. कार्यक्रमासाठी विकास हायस्कूल चे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रस्तावनेत मेधा पाटकर यांनी सांगितले की, सानेगुरुजी 125 जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्र भर व महाराष्ट्र बाहेरही, लेखक, कवी, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी, सानेगुरुजी ह्या विषयावर व्याख्यान देत आहेत त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे व त्यानिमित्ताने त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात स्वागतच आहे. साने गुरुजी हे फक्त शिक्षकच नसून त्यांनी शिक्षणाबरोबर श्रमिक, वंचित, दलित व शेतकऱ्यांसाठी कार्य करून खरे जनशिक्षक बनले. हेरंब कुलकर्णी यांनी सानेगुरुजी यांचे विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक घडवण्यासाठी कशाप्रकारचे शिक्षण दिले पाहिजे, शिक्षक कसा असला पाहिजे, याची उदाहरणे दिली. धुळे येथे कारागृहात असताना स्वातंत्र्य चळवळीसाठी आंदोलन करताना कारावास भोगत असलेल्या सह कैद्याच्या परिवारांना आपले कुटुंबाच्या चरितार्थाची काळजी होती, ती दूर करण्यासाठी गुरुजींनी जेलमध्ये पुस्तक लिहिले व त्याची जी रॉयल्टी मिळाली ती रक्कम कैद्यांच्या परिवाराला देण्यासाठी दिली. सानेगुरुजींची विविध कार्य आपल्या व्याख्यानातून दिली जी बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकली असतील. आताची शिक्षण व्यवस्था ही व्यावसायिक झाली आहे. त्यांनी हेही सांगितले की, शिक्षकांनी दररोज शेवटच्या तासाला विद्यार्थ्यांशी सामाजिक प्रश्नांवर चर्चा/गप्पा केल्या पाहिजेत. त्यामुळे एक सामाजिक भान असलेली पिढी निर्माण होऊ शकते. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात वाहरू भाऊ सोनवणे यांनी साने गरुजींच्या कार्याचा गौरव केला व स्त्री- पुरुष समानतेविषयी मार्गदर्शन केले. धडगाव येथून ॲड. लतिका राजपुत, ॲड. योगिनी खानोलकर, बोरदचे रघुनाथ पाटील, रामभाऊ चौधरी पाडळदे, प्रा. राजू पवार, काकळदाहुन विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार यांचे सहकारी, दादाभाई पिंपळे, चुणीलाल ब्राम्हणे, विनायक सावळे अनिस, नर्मदा जीवन शाळेचे शिक्षक, व पुनर्वसन वासाहतीतून युवा प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हे विशेष व्याख्यान एैकण्यासाठी धुळे महानगरातील राष्ट्र सेवा दल साथी सर्वश्री माधव गुरव, रमेश पवार, रमेश पाकड, एस.आर. वाणी सर, दत्ता बागुल, अनिल देवपूरकर, रामदास जगताप, गो.पि. लांडगे आदी साथी हजर होते.