*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात*
*जीटीपी महाविद्यालयात आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनीधी):-येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आंतर विभागीय हॉकी पुरुष आणि महिला स्पर्धांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. प्रसंगी व्यासपीठावर जी. टी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक टी.जी. पाटील, नंदुरबार विभाग क्रीडा समितीचे विद्यमान सचिव डॉ. देवेंद्र धाकड, विद्यापीठ संघाचे निवड समिती सदस्य डॉ. विनय पवार, प्रा. अख्तर खान, नंदुरबार विभाग संघ व्यवस्थापक प्रा. जुनेद काझी, एरंडोल विभाग संघ व्यवस्थापक प्रा. डॉ. सचिन पाटील उपस्थित होते. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, धुळे आणि एरंडोल अशा चार संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत पंच म्हणून किरण मिस्तरी, प्रवीण माळी, सूरज परदेशी आणि विशाल मराठे हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेतून विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांनी स्पर्धेचे आयोजक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.