*नंदूरबार पालिकेतर्फे मिशन रेबिजला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार पालिकेतर्फे मिशन रेबिजला सुरुवात*
*नंदूरबार पालिकेतर्फे मिशन रेबिजला सुरुवात*
नंदूरबार(प्रतिनीधी):-दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी नवा समाज निर्माण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार, व नंदुरबार नगर परिषद, नंदुरबार. तसेच वर्ल्डवाईड व्हेटर्नरी सर्विस, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील मोकाट व भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण विनामूल्य स्वरूपात करण्यात येणार आहे. याबाबतच्या पथकाला व वाहनाला आज रोजी मुख्याधिकारी राहुल वाघ व शहरातील पशुप्रेमी राधेश्याम ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी शहरातील सर्व व श्वान मालक व पशुप्रेमी यांनी सहभाग नोंदवावा व आपल्या श्वानांना रेबीज लसीकरण करून घेण्याचे आवाहन, नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाट यांनी आवाहन केले.
या प्रसंगी पाळीव श्वान मालकांनी त्यांच्याकडे असलेल्या श्वानांची नोंद नगर परिषदेकडे करण्यात यावी असे आव्हान करण्यात आले, मिशन रेबीज अंतर्गत लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व श्वानांना लसीकरणा करिता ज्या ठिकाणावरून पकडले त्याच ठिकाणी लसीकरण करून पुन्हा सोडण्यात येईल, याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ, प्रशासन अधिकारी जयसिंग गावित, स्वच्छता निरीक्षक सागर साळुंखे, रविंद्र काटे, दिलीप मराठे व इतर कर्मचारी तसेच पशु प्रेमी राधेश्याम ठाकरे, संस्थेचे प्रकल्प संचालक गौतम शिरसाठ व इतर कर्मचारी उपस्थित होते.