*पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशन टर्मिनसला मान्यता वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश-यशवंत जडयार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशन टर्मिनसला मान्यता वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश-यशवंत जडयार*
*पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशन टर्मिनसला मान्यता वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश-यशवंत जडयार*
वसई(प्रतिनीधी):-पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्हाच्या वसई, नालासोपारा, विरार ते डहाणू रोड हा दाट लोकवस्तीचा व बोईसर, पालघर, वाडा व भिवंडी हा मोठया प्रमाणात इंडस्ट्रीजचा परिसर आहे. त्यामुळे येथील रहिवाश्यांना रेल्वेने भारतात इतरत्र जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यासाठी जसे रायगड जिल्हात पनवेल टर्मिनल, ठाणे जिल्हात ठाणे व कल्याण जक्शन तसे पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्हामध्ये वसईरोड स्टेशन ला टर्मिनल बनवावे अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील 10 वर्षापासून मागणी करण्यात येत होती त्याला अखेर रेल्वेमंत्री आश्र्वीनी वैष्णव यांनी हिरवा कंदील दिला. या परिसरात वसई, बोईसर, पालघर, भिवंडी व वाडा परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून वसई, नालासोपारा व विरार परिसरात दाट लोकवस्ती असल्याने येथील रहिवाश्यांना पुढील प्रवासासाठी दादर, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, ठाणे किंवा कल्याण येथे फॅमिली व लगेच घेऊन जाऊन प्रवास करावा लागत असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो व वेळही वाया जातो.
वसई रोड टर्मिनलला जागेसाठी इंडीयन ऑईल कंपनी वसई किंवा मिठागर ते नायगाव येथील जागेचा वापर टर्मिनससाठी करावा व मेंटेनस, साफसफाई, पाणी यासाठी विरार प. यशवंतनगर येथील रेल्वे यार्डचा वापर करावा असे काही पर्यायही प्रवासी संघटनेने पश्चिम रेल्वे, पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावीत, विद्यमान खासदार हेमंत सावरा, केंद्रीय रेल्वे मा.राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा करण्यात येत होता. प्रवासी संघटनेच्या पश्चिम रेल्वे वरुन कोकण रेल्वे मार्गावर वसई सावंतवाडी पॅसेंजर ची अनेक वर्षांची मागणी आहे तीला वसईरोड टर्मिनस ही पुरक मागणी आहे, वसईरोड स्टेशन हे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व हर्बर लाईन यांना जोडणारे महत्वाचे स्टेशन असल्याने ते टर्मिनस झाल्यास पश्चिम रेल्वे वरून कोकण रेल्वे मार्ग व अन्य महाराष्ट्रात बऱ्याच एक्सप्रेस रेल्वे धावू शकतात, याचा फायदा बोरीवली ते डहाणू रोड येथील रहिवाशांना मोठया प्रमाणात होऊ शकतो असे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले. तसेच आपल्या प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार नायगाव ते ज्युचंद्र दरम्याने पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या फाटकाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्याने पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर व महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये मेल / एक्सप्रेस चालवण्यासाठी सोयीचे होणार आहे. वसई रोड टर्मिनस व नायगाव ज्यूचंद्र येथील फाटक जोडणीच्या कामाला मागील 10 वर्षापासून रेल्वे मंत्रालयाची मंजूरी मिळालेली आहे, मात्र ते काम आत्ता तरी पूर्ण केले जावे हीच प्रवासी संघटनेची माफक अपेक्षा. याचा फायदा येथील स्थानिकांना होईल. वसई रोड स्टेशनला टर्मिनस बनवण्यासाठी मान्यता मिळाल्याने समस्त वसई विरारकरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.