*जि.प.आदर्श शाळा शिरवलीच्या विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळीसाठी सुगंधी उटणे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.आदर्श शाळा शिरवलीच्या विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळीसाठी सुगंधी उटणे*
*जि.प.आदर्श शाळा शिरवलीच्या विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळीसाठी सुगंधी उटणे*
लांजा(प्रतिनीधी):-तालुक्यातील जि. प. पू. प्रा. आदर्श शाळा शिरवली येथे कार्यानुभावांतर्गत उत्पादक उपक्रमात दिवाळीसाठी सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विध्यार्थ्यांनी सुगंधी उटणे तयार केले. विध्यार्थ्यांनी या उटाण्याची शिरवली गावात घरोघरी जाऊन विक्री केली. संपूर्णपणे नैसर्गिक बनवलेल्या या उटण्यामध्ये नागरमोथा, कापूरकचरी, कचोरा, रानबावची, वाळा, संत्रा, आवळा, गुलाब, चंदन, मुलतानी माती, बेसन, इत्यादी वनस्पती चूर्ण पावडर यांचा वापर करण्यात आला आहे. या उटाण्याच्या पाकिटावर मतदान जनजागृतीचे संदेश लिहिण्यात आले आहेत. त्याद्वारे विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन ग्राहकांना करून जनजागृती केली आहे. सुगंधी उटणे निर्मिती व विक्रीद्वारे मतदान जनजागृतीच्या या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, पदवीधर शिक्षिका सौ. श्रद्धा दळवी, पदवीधर शिक्षक उमेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
युवक मंडळ शिरवली मार्फत मुंबई स्थित ग्रामस्थ्यांना या सुगंधी उटण्याची विक्री करण्यात आली. या उपक्रमाचे ग्रामस्थ, युवक मंडळ शिरवली, प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.