*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सरदार वल्लभभाई यांना अभिवादन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सरदार वल्लभभाई यांना अभिवादन*
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे सरदार वल्लभभाई यांना अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आधुनिक भारताचे शिल्पकार, महान स्वातंत्र्यसेनानी व भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकूण 149 व्या जयंती निमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले. शहरातील बालवीर चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी शहाद्याचे पोलीस उपनिरीक्षक शामकांत पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा दिला. प्रशासकीय सामाजिक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे रणजीतसिंग राजपूत यांचा वाढदिवसानिमित्त मंडळातर्फे बि.डी. गोसावी यांच्या हस्ते
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, विजया महिला मंडळाचे अध्यक्ष व निवृत्त गटविकास अधिकारी बि. डी. गोसावी, रामदास दगडू जाधव, अभिनव शाळेचे माजी मुख्याध्यापक व खोडसगावचे हरी पाटील, अशोक कुंभार, मंडळाचे सल्लागार जी. एस. गवळी यांच्यासह परिसरातील शालेय विद्यार्थी उपस्थित होते. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि विजया महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.