*‘(RBSK) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार, तर्फे 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची मोफत (2D ईको) हृदयरोग तपासणी संपन्न’*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘(RBSK) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार, तर्फे 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची मोफत (2D ईको) हृदयरोग तपासणी संपन्न’*
*‘(RBSK) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार, तर्फे 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची मोफत (2D ईको) हृदयरोग तपासणी संपन्न’*
नंदूरबार(प्रतिनीधी):-राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत महिला रुग्णालय नंदुरबार येथील डी.ई.आय.सी मध्ये ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार, व बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नंदुरबार जिल्ह्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी चे आयोजन करण्यात आले होते.
सदर हृदयरोग तपासणी (2D Eco) शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले असून याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बघुल, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा वळवी, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक श्री.मनोहर ढीवरे, सहाय्यक करण वसावे, जिल्ह्यातील आरोग्य पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी, डी.ई. आय.सी विभागातील सर्व कर्मचारी तसेच बालाजी हॉस्पिटल, भायखळा येथील सिनियर बाल हृदयरोगतज्ञ डॉ. जयश्री मिश्रा, तसेच बालाजी हॉस्पिटल समन्वयक प्रतिक मिश्रा व इतर अधिकारी कर्मचारी, इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, यांनी नंदुरबार जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा असून जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते त्या साठी बालकांच्या आरोग्य तपासासाठी स्वतंत्र कक्ष RBSK म्हणून कार्यान्वित असून पथकांद्वारे संपूर्ण जिल्ह्यात अंगणवाडी वर्षातून दोन वेळा, शाळा वर्षातून एक वेळा व आश्रम शाळा तीन महिन्यातून एक वेळा आरोग्य तपासणीचे कामकाज करण्यात येत असून कार्यक्रमाचे कामकाज सुरळीत सुरु आहे. या बाबत माहिती दिली. तसेच ज्या बालकांमध्ये ओठ व नखे निळसर पडणे, लहान बालकांना दूध पितांना थकवा घाम येणे, हृदयाची ठोके कमी जास्त होणे, हृदयात विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येणे, धाप लागणे, वारंवार सर्दी होणे, चक्कर येणे, अशी लक्षणे असल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालय नंदुरबार व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक व जिल्हा कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
दिनांक 28 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्फे राबविण्यात आलेल्या या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये एकूण 130 बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार, व बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबीर संपन्न झाले. सदर हृदयरोग तपासणी दरम्यान एकूण 29 बालकांना हृदयासंबंधी व्याधी आढळून आली असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत पुढील मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल भायखळा मुंबई येथे पाठविण्याचे लवकरच नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढीवरे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढीवरे, करण वसावे, धर्मेश भट्ट तसेच जिल्ह्यातील RBSK पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी, महिला रुग्णालय नंदुरबार येथील डी.ई.आय.सी. मधील सर्व अधिकारी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.