*हिंदू जन जागृती समितीच्या वतीने वसुबारस निमित्त विविध ठिकाणी गोपूजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदू जन जागृती समितीच्या वतीने वसुबारस निमित्त विविध ठिकाणी गोपूजन*
*हिंदू जन जागृती समितीच्या वतीने वसुबारस निमित्त विविध ठिकाणी गोपूजन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-हिंदू जनजागृती समितीच्या वतीने वसुबारस निमित्त विविध ठिकाणी गोपूजन करण्यात आले यामध्ये भालेर येथील धर्म शिक्षण वर्गातील मुलांनी गो पूजनाचे नियोजन केले तसेच नंदुरबार येथे धर्मप्रेमी मुलांनी एकत्र येऊन गोमातेचे पूजन केले यावेळी श्लोक प्रार्थना व गोमातेचे विधिवत पूजन केले
यामध्ये यावेळी गोमातेचे महत्व सांगण्यात आले
वसुबारस या दिवशी
बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करण्यास अडचण असेल, तेव्हा घरी एखादी गायीची मूर्ती असल्यास तिची पूजा करावी. घरी मूर्ती नसल्यास गायीचे पाटावर चित्र काढून त्याची पूजा करावी.
गोपालनाचे महत्त्व ! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्वतर्हेचे प्रदूषण गंभीररित्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एकप्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे. वसुबारस या सणाच्या निमित्ताने गोमातेचे महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया. गोमातेचे पूजन संपन्न झाल्यानंतर हिंदू राष्ट्रासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली व सर्वांनी गोपालन व गोरक्षणाचा संकल्प केला. या उपक्रमासाठी जितेंद्र मराठे, सतीश बागुल, सुमित परदेशी, भावना कदम, विकी पाटील, पवन बागुल, दीपक पाटील व धर्मप्रेमींनी परिश्रम घेतले व यावेळी गावातील महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोमातेच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.