*जिजामाता महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिजामाता महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न*
*जिजामाता महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):-10 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण विश्वात आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नंदुरबार व मानसशास्त्र विभाग जिजामाता महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिजामाता महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे होत्या तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. व्ही. देवरे होते.
या स्पर्धेत 11 वी ते TY कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. आत्महत्या प्रतिबंध जागृतीपर विविध पोस्टर या वेळी सादर करण्यात आले. या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. या स्पर्धेत कु. भैरवी चित्ते हिने प्रथम क्रमांक मिळविला तर विजया शिंदे व गणेश गावित यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. निकिता चौधरी व प्रियंका वसावे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. मुख्य अतिथी डॉ. वर्षा लहाडे यांनी आपल्या मनोगतात करियरचे महत्व, आत्मविश्र्वास व संभाषण कौशल्य विकास, कुटुंबाचे महत्व, मैत्री, प्रेम ई. अनेक महत्वाच्या विषयांवर आपले मत मांडले. मोबाईल हा युवकांचा शत्रू आहे व याचा वापर अत्यल्प असावा असे प्रतिपादन त्यांनी केले. प्राचार्य एस. व्ही. देवरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना हसत खेळत जीवन जगा व आनंदी रहा असा संदेश दिला.
जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजित मोरे, ऍड. राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश मेश्राम यांनी केले तर सूत्र संचालन प्रा. भगवती पाटील यांनी केले. आभार प्रा. भारत खैरनार यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. विजय खंडारे तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील डॉ. प्रवीण डोंगरे, परशुराम गवळी, आशुतोष सोनार, रमश्या वसावे श्रीमती विद्या बुंदेले यांनी परिश्रम घेतले.