*भारतीय 78 वा स्वातंत्र्य दिवस जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय 78 वा स्वातंत्र्य दिवस जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उत्साहात साजरा*
*भारतीय 78 वा स्वातंत्र्य दिवस जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनीधी):-स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. आज संपूर्ण भारतवासी, स्वातंत्र्य दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहे. त्यानिमित्ताने या शुभ प्रसंगी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सकाळी 7.30 मिनिटांनी डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सुरेल आवाजात राष्ट्रगीत तसेच झेंडा गीत म्हणून कार्यक्रमांमध्ये शोभा वाढविली. प्रसंगी जिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी ध्वजास मानवंदना दिली व एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. या अनुषंगाने, डॉ.वर्षा लहाडे, यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील राज्यस्तरीय रँकिंग नुसार आरोग्य सेवेत विविध राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाचे नावलौकिक वाढवीण्या करिता उत्कृष्ट काम आणि अथक प्रयत्न करणारे कर्मचारी यांच्यामुळे मार्च महिन्यात राज्यस्तरीय रँकिंग मध्ये तिसाव्या स्थानी असलेला नंदुरबार जिल्हा हा डॉ. वर्षा लहाडे यांच्या नेतृत्वात कार्य करत असताना जून महिन्याच्या राज्यस्तरीय रँकिंग मध्ये 6 व्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे, ही खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या कार्यामुळे राज्यात आरोग्य सेवेच्या बाबतीत नंदुरबार जिल्ह्याची मान उंचावलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर मागील तीन महिन्यापासून संपूर्ण राज्यात हॉस्पिटल रॅंकिंग मध्ये नंदुरबार जिल्हा अजूनही प्रथम क्रमांकावर कायम आहे. याचे श्रेय डॉ. वर्षा लहाडे यांनी स्वतः न घेता आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहे. आणि या साठी अहोरात्र झटणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनमोल असा वाटा आहे. हे नाकारता येत नाही, म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण व्हावी व त्यांना अजून जोमाने काम करायची प्रेरणा मिळावी, जेणेकरून सहाव्या क्रमांकावर असलेला नंदुरबार जिल्हा आरोग्याच्या बाबतीत राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी ची धडपड ही डॉ. वर्षा लहाडे यांची दिसून येत आहे. आणि म्हणून यासाठी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या माध्यमातून एकूण 22 अधिकारी कर्मचारी व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये यांना आरोग्य सेवा सन्मान पुरस्कार 2024 देऊन डॉ.वर्षा लहाडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात रँकिंग नुसार उत्कृष्ट काम करणारे ग्रामीण रुग्णालय,
ग्रामीण रुग्णालय विसरवाडी, जिल्ह्यात रँकिंग नुसार उत्कृष्ट काम करणारे उपजिल्हा रुग्णालय,
उपजिल्हा रुग्णालय तळोदा, डॉ. महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी नंदुरबार, जिल्ह्यात उत्कृष्ट क्षयरोग निर्मूलन नियोजन,
विजय साळुंखे उत्कृष्ट चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डॉ. शैलेश पटेल उत्कृष्ट प्रशुती शास्त्र तज्ञ, नवजात अर्भक सुरक्षा कार्यक्रम, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि नियोजन, डॉक्टर प्रवीण पाटील श्रीमती मोनिका बागले, उत्कृष्ट पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया डॉ. जर्मन सिंग पाडवी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा, उत्कृष्ट संतती प्रतिबंध शस्त्रक्रिया डॉ. अलाउद्दीन शेख वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय म्हसावद उत्कृष्ट जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय कर्मचारी भूषण पाटील, जिल्ह्यात उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक मनोहर ढिवरे, जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा समन्वयक. महिला रुग्णालय नंदुरबार उत्कृष्ट प्रशासन आणि व्यवस्थापन डॉ. किसन पावरा वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय नंदुरबार उत्कृष्ट एन. एच.एम ऑफिस कर्मचारी श्री. हितेंद्र सिंग राजपूत, (आय. पी.एच.एस.एस. आय) आयुष विभाग, डॉ. दुर्गेश शाह, वैद्यकीय अधिकारी आयुष विभाग, उत्कृष्ट परिचारिका, इंदू सूर्यवंशी आय.सी.यू विभाग, उत्कृष्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.हरीश कुमार कुकावलकर, औषध विभाग, व्यवस्थापन व नियोजन कमलेश थोरात औषध निर्माण अधिकारी जि.रू.नंदुरबार, उत्कृष्ट डायलेसिस तंत्रज्ञ श्रीमती.माधुरी इंगळे जिल्हा रुग्णालय नंदुरबार, उत्कृष्ट 102 रुग्णवाहिका वाहन चालक पवन पाटील, ग्रामीण रुग्णालय मोलगी विवेक वळवी जिल्हा रुग्णालय नंदुरबार, उत्कृष्ट राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम फिरते पथक, ग्रा.रू विसरवाडी पथक क्रमांक 03, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी. उत्कृष्ट राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (एन. टी .सी.पी) अधिकारी व कर्मचारी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त टीम.
अशाप्रकारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले असून, प्रसंगी डॉ. वर्षा लहाडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले असून, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात उंच झेप घेत आहेत, पुरुषांची मानसिकता आता बदलायला हवी, महिलांबाबत प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात कार्यालयात, परिसरात वागताना सन्मानाने वागण्याची गरज आहे, परिसरात महिलांवर होणारे अत्याचार हिंसा कुठेतरी आता थांबायला हवी, या बाबत संदर्भ देताना त्या म्हणाल्या की, नुकत्याच कलकत्ता येथे मेडिकल कॉलेज PG च्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या 31 वर्षीय महिला डॉक्टर यांच्यावर झालेल्या मानवी आत्यचार करून करण्यात आलेला घात हा मानवी समुदायावर काळीमा फासणारा आहे. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या समाजाला आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्यांनी बाबत खेद व्यक्त केला. आज भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्षे पूर्ण झाली असून देखील आपण स्री पुरुष समानता यावर वरवर चर्चा न करता महिलांना त्यांची हक्काचे स्थान द्यावे असे आवाहन केले.
या शुभप्रसंगी डॉ. वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार, डॉ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी, प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रीती पटले, डॉ.प्रज्ञा वळवी, डॉ. किसन पावरा, मनोज चौधरीbआदी मान्यवर तसेच जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर ढिवरे, (जिल्हा कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) यांनी केले असून सदर प्रसंगी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अवयवदान बाबत तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्ती बाबत कर्मचाऱ्यांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम समारोप करण्यात आला.