*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
नंदूरबार(प्रतिनीधी):- जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे रक्तकेंद्र (ब्लड सेंटर) कार्यन्वित आहे. येथे दररोज विविध आजाराचे रुग्ण रक्त संक्रमणासाठी दाखल केले जातात. सदर रक्त केंद्रामार्फत गोरगरीब व गरजू रुग्णांना रक्त पिशव्या पुरविल्या जातात. समाजातील सिकल सेल चॅलेसिमिया कुपोषित मुले मुली, गर्भवती माता, अपघातग्रस्त व इतर रुग्णांना रक्त दिले जाते. त्यामुळे रक्ताची गरज जास्त प्रमाणात भासत असते. जिल्हयात एकच शासकीय रक्तकेंद्र असल्याने सर्वच रुग्णांना रक्त पिशव्या पुरविणे अडचणीचे होते. त्यासाठी रक्तदान शिबीरांचे सतत आयोजन करण्यात आले तर जास्तीत जास्त रुग्णांना रक्त पिशव्यांचा पुरवठा करणे शक्य होईल.
त्यासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांचे सहकार्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली 1/ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार पोलीस मुख्यालयाच्या आवारात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीराच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी भेट देऊन जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत केले. यावेळी त्यांचेसमवेत पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) संजय महाजन, डॉ. रमा वाडीकर, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, डॉ. मोनिका वसावे, वैदयकीय अधिकारी, डॉ. सोनाली कुलकणी, वैदयकीय अधिकारी, व पथक असे उपस्थित होते. सदर रक्तदान शिबीरात सर्व पोलीस ठाणे, पोलीस दलातील विविध शाखा, पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी अशांनी स्वेच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबीर उत्स्फुर्तपणे पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, पोउपनि, ज्ञानेश्वर पाटील, असई विजयसिंग पाडवी, पोहेकॉ योगेश सोनवणे, पोहेकों भरत पावरा, पोहेकों भगतसिंग चव्हाण, मपोहेकों जया वसावे, पोना सुरेश गवळी, पोना आरिफ शाह फकीर अशांनी योगदान दिले.