*सर सय्यद उर्दू प्रायमरी,उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे वनसंवर्धन दिन निमित्त वृक्ष रोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर सय्यद उर्दू प्रायमरी,उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे वनसंवर्धन दिन निमित्त वृक्ष रोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन*
*सर सय्यद उर्दू प्रायमरी,उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, येथे वनसंवर्धन दिन निमित्त वृक्ष रोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन*
शहादा(प्रतिनीधी):-सर सय्यद उर्दू प्रायमरी, उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शहादा येथे 23 जुलै वनसंवर्धन दिन निमित्त वृक्ष रोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन. 23 जुलै रोजी सर सय्यद शाळा ता. शहादा येथे सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र शहादा व सर सय्यद उर्दू प्रायमरी व उर्दू गर्ल्स हायस्कूल, शहादा यांचे संयुक्त विद्यमाने "एक पेड मॉं के नाम" अंतर्गत वृक्ष लागवड बाबत जनजागृतीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष प्रा. सैय्यद लियाकत अली, विजय फणसे वनपाल धडगाव, सौ. शितल जाधव, वनपाल शहादा, भूपेश तांबोळी वनरक्षक शहादा, संस्थेचे संचालक ॲड. अब्दुल रहमान हासमानी, माजी प्राचार्य सैय्यद अतहर अली, शाळेचे विद्यमान प्राचार्य सैय्यद इफ़्तेखार अली हे उपस्थित होते. भूपेश तांबोळी वनरक्षक शहादा, सौ. शितल जाधव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना 23 जुलै वनसंवर्धन दिन, मतदार जनजागृती, शालेय स्वच्छता, वृक्ष लागवड काळाची गरज, बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विजय फणसे, भूपेश तांबोळी, यांच्याहस्ते शाळेतील एक उपक्रम हेल्प बॉक्सचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शाळेत शैक्षणिक सप्ताह अंर्तगत दिवस दोन (मुलभुत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस) चे विविध उपक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व वनअधिकारी यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. रामकृष्ण लामगे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण विभाग क्षेत्र शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय फणसे, सौ. शितल जाधव, व वनरक्षक भूपेश तांबोळी, वाहनचालक घनश्याम निकुंभे आणि शाळेचे कर्मचारी वृंद यांनी सहभाग नोंदविला. यावेळी महिला विद्यार्थिनींचा सहभाग उत्स्फूर्त होता. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्राथमीक विभागाचे प्रमुख शेख वकार, सर सैय्यद इको क्ल्बचे प्रमुख सैय्यद शोएब यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमात शाळेचे सर्व स्टाफ़ उपस्थित होते.