*प्राथमिक शिक्षक समिती खेडतर्फे विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्राथमिक शिक्षक समिती खेडतर्फे विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न*
*प्राथमिक शिक्षक समिती खेडतर्फे विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न*
खेड(प्रतिनीधी):-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने नुकताच विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा तालुका अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंगल कार्यालय, भरणे येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद शाळेमधून इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी, नवोदय निवड झालेली विद्यार्थी, नासा इस्रो यासाठी निवड झालेले विद्यार्थी, याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एम.टी.एस., बी.डी. एस., के.टी.एस., आय.टी. एस., होमी भाभा, मंथन या परीक्षांमध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रांझ पदक विजेते पाल्य, पाचवी आठवी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवत्ताधारक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांची दहावी बारावी उत्तीर्ण मुले तसेच जे. ई ई.,नीट, सी.ई.टी. हे शिक्षण प्रवेशक्रम उत्तीर्ण मुले, शिक्षकांची डॉक्टर, इंजिनियर व अन्य तत्सम शिक्षणक्रम डिग्री, डिप्लोमा पूर्ण केलेली सर्व पाल्य, तसेच क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केलेले पाल्य अशा सुमारे 128 सन्मानार्थिंचा सन्मान संघटनेच्या वतीने भेटवस्तू, सन्मान चिन्ह सन्मानपत्र, गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी संजय दरेकर, सखाराम मोहिते, यांचेसह केंद्रप्रमुख मंगेश भोसले, विश्वनाथ पवार, भास्कर जंगम, विजय निकम, दिलीप सावंत यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील सन 2023-24 मधील सेवानिवृत्त शिक्षकांसह बी.एड., एम.ए. तथा नेट- सेट, अन्य उच्च शिक्षण घेतलेले शिक्षक, जि.प. पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणांनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त शाळा, विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना गौरवण्यात आले.
उस्फुर्त गर्दीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित दिलीप महाडिक, अंकुश गोफने, रुपेश महाडिक, संतोष पावणे, संजय दरेकर, सखाराम मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर यांनी सदर सोहळ्याबद्दल व संघटनेच्या इतर उपक्रमांचे कौतुक केले तसेच संघटना पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि संघटनेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी सुरू असलेल्या कार्य याबद्दल सभागृहातील उपस्थित सर्व शिक्षकांना माहिती दिली व संघटनेच्या प्रवाहात आपले योगदान देऊन शिक्षक समितीच्या प्रवाहात सामील होऊन समितीचा आवाज बुलंद करून शिक्षकांना न्याय मिळवून देणाऱ्या लढ्यात, सहभागी होण्याचे व त्याला साथ देण्याचे आवाहन सभागृहाला केले. शिक्षक समिती केवळ शिक्षकांसाठीच नव्हे तर पालक बालक आणि शिक्षक आणि समाजात सगळ्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उदगार मान्यवरांनी काढले. यावेळी खेड शाखेच्यावतीने केलेल्या नियोजनाचे आणि सूत्रबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. या सोहळ्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले साहेब यांचे सह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, जिल्हा शिक्षक नेते दिलीप माडीक, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश शिर्के, चिपळूण तालुका सचिव आर. डी. मोहिते, जिल्हा संपर्कप्रमुख विश्वास भोपे, दिवाकर प्रभू, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक सुनील दळवी, जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी संजय सुर्वे, श्रीकृष्ण खांडेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तालुका पदाधिकारी सहसचिव धर्मपाल तांबे उपाध्यक्ष अनिल यादव, प्रसिध्दी प्रमुख दिलीप यादव, बबन मोरे, अनिल मोरे, अमर चव्हाण, रघुनाथ महाडिक, नवनीत घडशी, संतोष चव्हाण, भागोजी कडव, येडू केकान, नारायण शिरकर, तुकाराम काताळे, संतोष मोरे, संतोष बर्वे, सुधाकर बामणे, नितेश कांबळे, अनंत मोरे, भारत घुटूकडे, गजानन पालांडे, अशोक पाटील, सुरसिंग ठाकरे, शशिकांत भुवड, अमोल जाधव, उदय रेडीज, भाऊसाहेब कांबळे, विजय चव्हाण, महेश शेडगे, राजेश कोरे, गोपीनाथ पवार, भिकू जानकर, चंद्रकांत पवार, केशव मुंडे, अनिल आंजर्लेकर महिला प्रतिनिधी सौ.सुविधा सावंत, सौ.दिक्षिता तांबे, सौ.दीप्ती यादव, श्रीम. रत्नप्रभा भोसले, श्रीम. स्नेहल यादव, सौ.विद्या घडशी, सौ.रसिका खांडेकर, श्रीम.लीना हरमळकर, सौ.नेहा सुर्वे, सौ.प्रतीक्षा पवार, सौ.नेहा देवरुखकर, सौ. किरण जानकर, सौ. सारिका कदम सौ. शर्वरी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी,पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी तेचे सर्व श्रेय नियोजन करणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक समिती शिलेदार सभासद बंधू भगिनींचे, स्वेच्छेने देणगी दिलेल्या देणगीदारांचे व उपस्थित विद्यार्थी पालकांचे असल्याच्या भावना आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद भोसले यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपल्या ओघवत्या शैलीत काव्यात्मक गुंफणीतून दिपक कांबळे यांनी तर सर्व मान्यवर उपस्थितांचे व कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार अनिल मोरे यांनी मानले आणि या यशस्वी गुणगौरवाची सांगता झाली.