*लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित*
*लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित*
नांदेड(प्रतिनीधी):-राज्यातील एक प्रतिष्ठेचा सन्मान म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुम चव्हाण स्मृती पुरस्कारांचे यंदाचे विजेते जाहीर झाले असून, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. निलेश खरे, प्रख्यात चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि 'फोर्ब्स'कडून गौरव झालेले उद्योजक दाम्पत्य पंकज महल्ले व सौ. श्वेता ठाकरे यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती तसेच दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या 14 जुलै रोजी दुपारी 4 वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर उपस्थित राहतील, अशी माहिती संतोष पांडागळे यांनी दिली.
कै.सौ. कुसुम चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवानंद महाजन, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील व सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे.