*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील वेरळ येथील जिल्हा परिषद शाळेत दारुच्या नशेत धिंगाणा घालून शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाविरोधात लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे
सदरची घटना ही 2 नोव्हेंबर 2026 रोजी सायं 4.45 वाजण्याच्या सुमारास जि.शाळा वेरळ, धावणेवाडी येथे शाळेत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदकुमार बळीराम भागवत हे शिक्षक दैनंदिन शासकीय कामकाज करत असताना कूणाल शांताराम कुर्णेकर (वय 38) रा.वेरळ, गायदवाडी हा दारुच्या नशेत शाळेत घुसला व वाद घालू लागला वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असून आरोपीने शिक्षकांना मारहाण केली
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरले शाळा व्यवस्थापनाने याची त्वरित माहिती लांजा पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिस न्याय संहिता 203 च्या कलम 132,131,12(1) 352,351(2) महाराष्ट्र तसेच भारतीय दारुबंदी कायदा 851 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.



