ताजा खबरे:
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*
*राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी*
*बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखला तयार करून अंगणवाडी सेविका पदासाठी केलेला अर्ज रद्द*
*आदिम जमाती व पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज, कातकरी, कोलाम व माडिया जमातींसाठी 130 कोटी; पारधी समाजासाठी 30 कोटी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*

  • Share:

*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*
खेड(प्रतिनिधी):-भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करून गावाला जलसमृद्ध बनविण्याच्या उद्देशाने चोरवणे उतेकर गावठाण येथील टेपवणे नदीतील पिण्याच्या पाण्याच्या डोह परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ, मुंबई/पुणे आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकारातून सलग तीन दिवस श्रमदान करून जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या मोहिमेदरम्यान नदीपात्रातील गाळ, मोठे दगड आणि वाळू बाजूला करून पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने टेपवणे नदीपात्राची स्वच्छता, खोली व रुंदीकरण करण्यात आले. सामूहिक श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला. मोहिमेच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी नदीपात्रातील अन्य दोन ते तीन संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली.या ठिकाणी भविष्यात बंधारे उभारून पावसाचे पाणी अडविणे आणि भूजल पातळी वाढविणे हे ग्रामविकास मंडळांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पक्का आरसीसी बंधारा उभारण्याचाही मानस असून, त्यासाठी लोकसहभागातून निधी संकलित करून चोरवणे गावाच्या जलसंवर्धनाला कायमस्वरूपी दिशा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.या मोहिमेसाठी चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सल्लागार श
भिकाजी महादेव उतेकर, माजी सचिव तथा ज्येष्ठ सल्लागार सुधाकर महादेव उतेकर,ज्येष्ठ ग्रामस्थ मारुती धोंडू उतेकर, गजानन आत्माराम उतेकर शिवाजी केशव उतेकर आणि माजी उप सरपंच प्रवीण तुकाराम सावंत, विजय सीताराम जाधव, अनंत बाबाजी जाधव, शांताराम बाबाजी उतेकर, प्रमोद पांडुरंग जाधव, मनोहर रघूनाथ सकपाळ, मानाजी केशव उतेकर, चंद्रकांत कृष्णा जाधव, दिलिप दगडू उतेकर, सुरेश गोपाळ उतेकर, सुरेश विष्णू सकपाळ, युवराज विजय जाधव, मनोहर अनंत उतेकर, ज्ञानेश्वर धारोजी उतेकर, चंद्रकांत रघुनाथ सकपाळ, अनंत मारोती उतेकर, मंगेश धोंडू मोरे, मंगेश महादेव उतेकर, किशोर अनंत शिंदे, भरत शांताराम जाधव व महादेव पांडुरंग उतेकर, अनिल गंगाराम उतेकर, राजेश शांताराम उतेकर,तसेच श्रीम.पूनम प्रमोद जाधव व श्रीमती श्रध्दा प्रविण सावंत या महिलांसह स्नानिक महिलावर्ग उपस्थित होत्या. तसेच मुंबई व पुणे येथील चाकरमानी आणि ग्रामस्थांनी मोठा पुढाकार घेतला.‌ सर्वांच्या एकजुटीतून आणि लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.या उपक्रमाला नाम फाउंडेशनचे प्रथमेश पोमेंडकर, अनुलोमचे मयुरेश पाटणकर, ग्रामपंचायत प्रशासन, हितचिंतक बनेमामा, चोरवणे गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिलावर्ग तसेच शारदा विहार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहभागामुळे मोहिमेला अधिक बळ मिळाले.
मुंबईहून प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान करणारे कार्यकर्तेया मोहिमेत मुंबईहून प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान करणारे शंकर नारायण उतेकर, ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रसाद गजानन उतेकर, प्रशांत प्रकाश उतेकर, योगेंद्र यशवंत मोरे, सागर ज्ञानेश्वर उतेकर, संजय विष्णू सकपाळ, निकेश संजय चव्हाण, समीर शंकर उतेकर, संकेत भिकाजी उतेकर, स्वप्नील रमेश उतेकर आणि दिनेश विजय जाधव यांच्यासह सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. स्वतःचा कामधंदा सांभाळून सुट्टीच्या दिवशी गावासाठी वेळ देत श्रमदान करणाऱ्या या कार्यकर्त्यांची गावाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी आहे.
या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होता न आलेल्या मुंबई व पुणे येथील ग्रामस्थांनीही आर्थिक योगदान देऊन जलसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावला. त्यामुळे प्रत्यक्ष श्रमदानासोबतच आर्थिक सहकार्याच्या माध्यमातूनही गावकऱ्यांची एकजूट दिसून आली. सर्व देणगीदार, ग्रामस्थ, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि हितचिंतक मार्गदर्शकांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि उन्हाळ्यात जाणवणारी भविष्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता जलसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून गावाच्या पाणीप्रश्नावर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी काळात आणखी बंधारे उभारून चोरवणे गावाला जलसमृद्ध बनविण्याचा निर्धार चोरवणे नागेश्वर ग्रामविकास मंडळ, मुंबई/ पुणेयांनी व्यक्त केला आहे.पाणी अडवा, पाणी जिरवा — गाव वाचवा, भविष्य घडवा.या संदेशातून गावाच्या जलसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे,असे आवाहन करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
November, 06 2026
*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*
November, 05 2026
*राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी*
November, 05 2026
*बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखला तयार करून अंगणवाडी सेविका पदासाठी केलेला अर्ज रद्द*
November, 05 2026
*आदिम जमाती व पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज, कातकरी, कोलाम व माडिया जमातींसाठी 130 कोटी; पारधी समाजासाठी 30 कोटी*
November, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज