*नरसीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन, शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांचा उत्साह,श्रावण भिलवंडे यांच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन, शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांचा उत्साह,श्रावण भिलवंडे यांच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी*
*नरसीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन, शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांचा उत्साह,श्रावण भिलवंडे यांच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी*
नांदेड(प्रतिनिधी):-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील नरसी येथे 31 ऑक्टोबर रोजी संघाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गणवेशातील स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाने नरसीच्या प्रमुख मार्गांवर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या पथसंचलनाचे स्वागत करताना भारतीय जनता पक्षाचे नेते तथा नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने बिलोली रोड तसेच मुख्य चौकात स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नरसी येथील जुन्या गावातील श्रीराम मंदिर परिसरातून पथसंचलनाला प्रारंभ झाला. पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध रांगेत उभे असलेल्या स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर संचलनास सुरुवात केली. जुन्या गावातून मुख्य चौकमार्गे बिलोली रोडवरील दत्त मंदिरापर्यंत पथसंचलन काढण्यात आले. त्यानंतर देगलूर रोडवरील श्री भगवान बालाजी मंदिर येथे संचलनाची सांगता झाली. संपूर्ण मार्गावर स्वयंसेवकांची शिस्त, एकसमान चाल आणि संघटनात्मक एकजूट दिसून आली. शताब्दीपूर्तीच्या वाटचालीचा घेतला आढावा.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष उचेकर आणि चंद्रकांत पतकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत त्यांनी संघाचे कार्य, संघटनात्मक बांधणी, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्र जीवनातील स्वयंसेवकांची भूमिका याविषयी विचार मांडले. शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करून संघाने 101 व्या वर्षात पदार्पण केले असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
27 सप्टेंबर 1925 रोजी झाली संघाची स्थापना,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी केली. समाजसंघटन, शिस्त, स्वयंसेवकांचे व्यक्तिमत्त्व घडविणे आणि राष्ट्रभावनेची जाणीव निर्माण करणे या उद्देशांनी सुरू झालेल्या संघाने शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या शताब्दीपूर्तीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, नरसी येथे झालेल्या पथसंचलनालाही याच पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले. पथसंचलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. शिस्तबद्ध पथसंचलन, पुष्पवृष्टी आणि प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



