*खांबवली ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खांबवली ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
*खांबवली ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
तळा(प्रतिनिधी):-यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे अन्नधान्यासहीत पाणी टंचाईचे भिषण संकट निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन खांबवली ग्रामस्थांनी एकत्र येत आबाल वृद्धांना विश्वासात घेऊन शासनाच्या निर्णयाचे स्वागत करुन बंधारा बांधण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद काम केले आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरव' हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचे आणि गावाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा वाढण्यास, भूजल पातळी सुधारण्यास तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास निश्चितच मदत होईल. गावाच्या हितासाठी स्वतःचा वेळ, श्रम आणि योगदान देणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. गावाच्या विकासासाठी सर्वांनी असच एकजुटीने काम करणं ही काळाची गरज व हिच अपेक्षा आहे. खांबवली ग्रामस्थ मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा देताना भविष्यातही गावाच्या विकासासाठी असेच विधायक उपक्रम घडत राहोत, ही करजाई मातेकडे प्रार्थना यावेळी करण्यात आली खांबवली मुळगाव हे जरी लोकसंख्येच्या तुलनेत कमी असले तरी तेथे वैचारिक विचारांची देवाणघेवाण होत असते त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जात असतात याची दखल घेत शासन कर्मचारी नेहमीच या गावात उपक्रम सभा घेऊन इतरांना संदेश देत असल्याचे ऐकण्यात आले आहे. हे सुद्धा अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तसेच लोकाभिमुख सेवाभावी संस्थेच्या वतीने या गावाला अनेकवेळा गौरविण्यात आले आहे. ही विशेष कौतुकाची बाब आहे. अशा प्रकारे तळा तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर ग्रामस्थांनीही असे निर्णय सर्व सहमतीने घ्यावेत व येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे. असे आवाहन
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तळा अध्यक्ष यशवंत शिंदे यांनी केले आहे.



